शरीर निरोगी राहावे यासाठी नियमित व्यायाम, करणं आवश्यक आहे.नियमित व्यायाम केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल.
बऱ्याच लोकांना लठ्ठपणा हि एक आजकाल खूप मोठी समस्या झाली आहे. सूर्यनमस्काराच्या १२ आसनांमुळे शरीराच्या प्रत्येक अवयवाचा व्यायाम होतो.सूर्योदयाच्या वेळी दिवसाची सुरवात सूर्यनमस्कारानी केल्यास दिवसभर मन एकदम प्रसन्न राहते.आपल्या कामात आपली एकग्रता वाढते.
दररोज २५ सूर्यनमस्कार घालण्याची सवय आपण सगळ्यांनी लावून घेतली पाहिजे.
1.शरीर लवचिक बनते.
2.अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे रक्तभिसरण (Blood Circulation ) वाढते.
3.महिलांनी सूर्यनमस्कार करणे खूप गरजेचे आहे. केस गळणे थांबते व blood circulation मुळे केस वाढण्यास मदत होते .
4.मासिक पाळीचे प्रॉब्लेम्स दूर होऊन पाळी नियमित येण्यास मदत होते.
5.ज्यांना Body Maintain करायची आहे त्याच्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे.
6.पचनसंस्था नीट काम करते त्यामुळे पचनक्रिया सुधारते .
7.स्मरणशक्ती वाढते.
8.तारुण्य टिकून राहते आणि चेहेरा तजेलदार दिसतो.

Comments
Post a Comment