आपल्याला कधी कधी बारीक ताप येतो. अन्न कडू लागते,काहीही खावेसे वाटत नाही.हे कमी करण्यासाठी आपण आज घरगुती उपाय पाहणार आहोत.
एका पातेल्यात १ ग्लास दूध घ्यावे.या दुधात चवीपुरती साखर, एक तुकडा सुंठ किंवा आल्याचा तुकडा बारीक करून टाकावा.२ चमचे हळद टाकावी.
आता हे दूध १० मिनिट उकळून घ्यावे.
हे दूध अगदी थोडेसे थंड करून प्यावे. असे दिवसातून २ दा करावे.
असे केल्याने ताप कमी होण्यास मदत होते. हळद आणि दूध आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. हळदीमध्ये कसलेही इन्फेक्शन कमी होते.

Comments
Post a Comment