साहित्य : एक किलो तांदुळ
दीड वाटी चणा डाळ
अर्धी वाटी मुगडाळ
अर्धी वाटी ज्वारी
अर्धी वाटी पोहे
एक वाटी तेल
एक चमचा जिरे
तीळ आणि धने
चवीपुरते मीठ व तिखट
तेल
कृती :
१.सर्वप्रथम तांदुळ, दोनही डाळी, पोहे, ज्वारी हे एकत्र करून थोडेसे हलके भाजून घ्यावे.
२.त्यात धने व जिरे घालून हे सर्व मिश्रण दळून आणावे.
३. वरील मिश्रणाचे पीठ एका ताटात घेउन त्यात मीठ, तिखट, तीळ, तेल थोडेसे कोमट करून घ्यावे मिक्स करून घ्यावे.
४.या मिश्रणात गरजेपुरते कोमट पाणी घालून घट्ट मळून घ्यावे.
५.यात हळद वापरू नये. चकल्या करून तेलात लालसर तळव्यात.
६. अश्या पद्धतीने आपली खुसखुशीत चकली तयार आहे.

Comments
Post a Comment