१. भात मोकळा शिजवण्यासाठी
बऱ्याच महिलांची तक्रार असते की , भात चिकट होतो.
जर आपल्याला भात मोकळा हवा असेल तर आपण भात कुकर मध्ये लावावा आणि पाणी तांदळाच्या दुप्पट घ्यावे .
भात लावतानाच त्यात अर्धा लिंबू पिळून घ्यावे . लिंबू नसेल तर २ चमचे दही पण आपण टाकू शकतो.
भातातील पाणी आर्धे आटल्यावर कूकरचे झाकण लावावे .
अश्या पद्धतीने भात शिजवल्यास आपला भात नक्कीच मोकळा शिजेल.

Comments
Post a Comment