आजकाल पित्ताचा त्रास अनेकांना असतो. ताणतणाव,अवेळी जेवण,धावपळ,वेळच्यावेळी पाणी न पिणे अशी
बरीच कारण आहेत . पित्ताचा त्रास कोणालाही होऊ शकतो. पित्तामुळे अनेकांची चिडचिड होणे ,डोकेदुखी,उलटी
त्रास होतात . त्रास होतो म्हणून आपण गोळ्या घेतो . या गोळ्या शरीराला खूपच अपायकारक असतात .
हे सर्व टाळण्यासाठी आपण आता पित्त होऊ नये म्हणून घरगुती उपाय करणार आहोत .१. थोडस खोबरं आणि २ ते ३ चमचे धने दोन्ही बारीक करून त्याच मिश्रण आपल्याला चावून खावे.असे ७या ते ८ दिवस करावे . याने आपल्याला पित्तावर मात करणे शक्य होणार आहे .
२. धान्याची एक चमचा पावडर आणि एक ग्लास पाणी एका तांब्याच्या भांड्यात रात्री ठेवून ते पाणी सकाळी अनुष्यपोटी प्यावे . असे १५ दिवस केल्याने पित्त कमी होण्यास मदत होते .
३. सुंठ बारीक करून त्याची अर्धा चमचा पूड आणि अगदी थोडी साखर या दोन्ही ची गोळी करून ती सकाळी उपाशीपोटी खाल्ल्याने देखील पित्त लवकर बरे होते.

Comments
Post a Comment