एकदम सोपी tasty लवकर होणारी रेसिपी आहे.अचानक जर नातेवाईक आले तर कमी वेळात आणि कष्टात आपण ही रेसिपी बनवू शकतो.
साहित्य:
१ मोठी वाटी मोड आलेली मटकी
खोबरं खीसलेल पाव वाटी
आल
२ कांदे
२ टोमॅटो
कोथिंबीर
चवीपुरते मिठ आणि तिखट
४ वाटी फरसाण
पाव
कढीपत्ता
जिरे आणि मोहरी
तेल
गरम पाणी
कृती:
१. सर्वप्रथम कांदा आणि टोमॅटो बारीक कापून घावा. नंतर आल, थोडीशी कोथिंबीर ,कढीपत्ता आणि खोबरं मिक्सर मधे बारीक करून घ्यावे.
२.आता पातेल्यात ३ मोठे चमचे तेल घ्यावे.तेल गरम झाले की त्यात जिरे आणि मोहरी टाकून घ्यावी.जिरे मोहरी त तडतडल्यावर थोडी कढीपत्त्याची पाने टाकावीत .
३. यानंतर बारीक करून घातलेले खोबऱ्याची पेस्ट टाकावी. खोबरं थोडसं लालसर झालं की त्यात कापून घेतलेला कांदा आणि टोमॅटो टाकून घ्यावा.
४.कांदा आणि टोमटो तेलात मऊ झाल्यावर त्यात चवीपुरते मीठ आणि तिखट टाकून घ्यावे.
५. आता यामध्ये आपण मोड आलेली मटकी टाकून घेवू .
६.मटकी तेलात २ मिनिट परतल्यानंतर आपण यात गरम पाणी टाकून घेवू.
७. गॅसच्या बारीक आचेवर आपण ही मिसळ २० मिनिट उकळून घेणार आहे.
८.अश्याप्रकारे आपली मिसळ तयार आहे.
९. सर्व्ह करताना आपल्या ला मिसळ बाउल मधे घवून त्यात फरसाण आणि बारीक कापलेला कांदा आणि कोथिंबीर घ्यायची आहे आणि साईड ल पाव.
१०.असा मिसळीची एकदम मस्त बेत होतो.
Comments
Post a Comment