कांदा आरोग्यासाठी खुप फायदेशीर असतो.केस गळतीवर अनेकजण कांद्याचा वापर करतात.उन्हाळ्यात आपण कांदा रोज दुपारी खातोच.असेच कांद्याचे अनेक फायदे आहेत.
आज आपण कांद्याचा सलाड पाहणार आहोत.अगदी सोपी आणि झटपट अशी ही रेसिपी आहे.
साहित्य:
४ मोठे कांदे
लाल तिखट
मीठ
चाट मसाला
लिंबू
कृती:
सर्वप्रथम आपण कांदे (round) रिंग्ज किंवा गोल आकारात कापून घ्यावेत.
आता यात आपण चवीपुरते लाल तिखट, चवीपुरते मिठ, १ चमचा चाट मसाला टाकून घ्यावा. ४-५ थेंब लिंबू पिळून घ्यावे.
अशा प्रकारे आपला कांदा सलाड तयार आहे.
एकदम अप्रतिम आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे.
आपण नक्की ट्राय करा.

Comments
Post a Comment